Wednesday, November 16, 2005

राहिले अव्यक्त माझे, प्रेम तुजवरचे, सखे

व्यक्त केल्यावाचुनी का, ना कळे तुजला, सखे.

सांगण्याचे कितितरी मी यत्न केले, पण तरी

राहिले सांगावयाचे कितितरी तुजला, सखे.

दिवस गेले, मास गेले, वर्षे तरी गेली किती

दिसलीच ना माझ्या मनिची, भावना तुजला, सखे.

विश्वास माझा का धरू, वाटे असे सखये तुला

दोष हा माझाच सारा, दोष ना तुजला, सखे.

No comments: